ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!

शर्मिला ठाकरे यांनी केले उद्धव ठाकरेंना लक्ष्य

ज्यांच्यामुळे नेते सोडून गेले, त्यांच्याच हातून आज पक्ष निसटला!

राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे यावर शिकामोर्तब केले. यानंतर राजकीय वर्तुळातून निरनिराळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यावर मनसे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या विक्रोळी महोत्सवात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “एका वाक्यात सांगायचे झाले तर वर्तुळ पूर्ण झाले आहे. शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं. त्याच्याच हातातून पक्ष सुटला आहे. या अगोदर देखील दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप होत असताना शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल होती. शर्मिला ठाकरेंनी पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंवर शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केला होता. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी यांनी केला होता.

हे ही वाचा:

इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!

२००५ साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंमुळे अनेकांना पक्ष सोडावा लागल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. उद्धव आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना कंटाळून शिवसेना सोडली. जेव्हा शिवसेना या पक्षातून बाहेर पडलो त्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला, असेही  राज ठाकरे म्हणाले होते. २७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर दोघांनी एकमेकांविरोधात तीव्र टीका केली; आरोप-प्रत्यारोप केले. फार क्वचित कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्र दिसले.

Exit mobile version