कोणीही येऊन हिंदूंना शिव्या घालाव्यात हीच ठाकरे सरकारची इच्छा

कोणीही येऊन हिंदूंना शिव्या घालाव्यात हीच ठाकरे सरकारची इच्छा

हिंदूविरोधी गरळ ओकणारा जिहादी विचारांचा तरुण शर्जील उस्मानी याचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. बुधवारी शर्जील उस्मानी पुणेतील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ३० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत उस्मानी वक्ता होता. यावेळी आपल्या भाषणात ‘हिंदू समाज सडलेला आहे’ असे आक्षेपार्ह वक्तव्य उस्मानी कडून करण्यात आले होते.

मंगळवारी महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात असे आश्वस्त करण्यात आले की न्यायालयाच्या पुढच्या सुनावणी पर्यंत उस्मानीच्या विरोधात अटकेची किंवा इतर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. या नंतर उच्च न्यायालयातर्फे शर्जील उस्मानीला बुधवारी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर होण्याचा आदेश देण्यात आला. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करताना उस्मानी पुणे पोलिसांसमोर हजर झाला.

हे ही वाचा:

भारताच्या पूर्व सीमांचे रक्षण राफेलकडे

बंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम

३० जानेवारी रोजी पुणे येथे पार पडलेल्या ‘एल्गार परिषद’ या वादग्रस्त कार्यक्रमात शर्जील उस्मानीने हिंदू विरोधी गरळ ओकल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. उस्मानीच्या या वक्तव्याविरोधात पुणे येथील वकील प्रदीप गावडे यांनी २ फेब्रुवारी रोजी स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार उस्मानी विरोधात भारतीय दंड संहितेच्या १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी उस्मानीचा जबाब नोंदवल्यावर ‘न्यूज डंका’ ने तक्रारदार ऍड.प्रदीप गावडे यांच्याशी संपर्क साधला. “महाराष्ट्र प्रशासन व पोलीस सुरुवातीपासून समस्त हिंदूंना सडलेले म्हणणाऱ्या शर्जिल उस्मानीला पाठीशी घालत आहे. आमची तक्रारीत मागणी असतानाही त्याच्यावर कठोर कलमान्वये कारवाई करण्यात आली नाही. कुठलाही तपास करण्यात आला नाही किंवा त्याला अटक करण्यासाठी काही प्रयत्नही करण्यात आले नाही. ज्या सरकारने शर्जिल उस्मानीला पाताळातूनही शोधून आणण्याची घोषणा केली होती त्यांनीच ४१अ ची नोटीस देऊन रेड कार्पेट टाकून शरजिल उस्मानीला चौकशी साठी बोलावले. हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात येऊन कोणीही हिंदूंना शिव्या घालून जाव्यात अशीच सरकारची भूमिका दिसत आहे.” अशी प्रतिक्रिया ऍड. गावडे यांनी ‘न्यूज डंका’ शी बोलताना दिली.

Exit mobile version