राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं पवार आणि मोदी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. ही भेट नेमकी काय कारणास्तव झाली आणि भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्यापही समोर आलेले नाही. पण असे असले तरीही या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात निरनिराळ्या चर्चांना उधाण आले आहे.
बुधवार, ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेले. संसदेचे अधिवेशन संपायला दोन दिवस शिल्लक असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये संसदेत भेट होऊन चर्चा झाली. जवळपास एका वर्षाच्या कालावधीनंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत.
हे ही वाचा:
‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’
माननीय बाळासाहेब, जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या
कामावर रुजू व्हा, मुंबई उच्च न्यायालयाच्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचना
RRR १००० कोटींच्या उंबरठ्यावर! PK ला मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम
महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर सुरू असलेली केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडी कडून आलेली जप्ती, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सीबीआयने घेतलेला ताबा, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणाऱ्या काही नवीन घटना पाहायला मिळणार का? याबाबत कुजबूज पाहायला मिळत आहेत.
काल शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांचे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहभोजनाला भाजपच्या काही आमदार तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे देखील सहभागी झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आज पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होत आहे. त्यामुळे देखील या भेटीबद्दल अधिक चर्चा होताना दिसत आहे