राज्यात आपल्या तडाखेबंद भाषणाच्या माध्यमातून शरद पवार यांच्याबद्दल एकामागून एक असे गौप्यस्फोट करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणानंतर आज जेष्ठ नेते शरद पवार काय बोलणार? अजित पवार यांच्या भाषणावर घणाघाती टीका करणार अशा बातम्या दिवसभर विविध वृत्तवाहीन्यांवर सुरु होत्या. त्यामुळे राज्याचं लक्ष हे शरद पवार यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेकडे होते. मात्र, शरद पवार यांनी सगळ्यांचाच हिरमोड केला आणि अजित पवार यांच्या आरोपांना त्यांनी फारशी उत्तर दिली नाहीत.
शरद पवार यांची हि जुनी सवय राहिलेली आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांना ते फारसे उत्तर देण्याच्या फंदात पडत नाहीत. पण इतकी वर्ष हे चालले कारण आरोप करणारे चेहरे वेगळे होते आता तर आपलेच पुतणे आणि अनेक वर्ष राजकारणात सोबत राहिलेल्या अजित पवार यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत. हा यातील महत्वाचा फरक आहे. मात्र, शरद पवार यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधून ज्या प्रकारे अजित पवार यांनी केलेले आरोप त्यांनी खोडून काढायला हवे होते तसे काहीच झाले नाही. ही पत्रकार परिषद म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणारी ठरली. त्यामुळे शरद पवार यांची अवस्था आता अरन्यरुदन झाल्यासारखी झाली आहे. त्याचं ऐकायला आता त्यांच्याकडे फारसे आमदार, खासदार उरलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यात वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्षातील बहुसंख्य आमदार, जिल्हा पातळीवरील नेते आज अजित पवार यांच्या बरोबर आहेत. शरद पवार यांच्याकडे आता फारसे कोणी उरलेले नाही. ते कितीही म्हणत असले तरी त्यांना आजच्या पत्रकार परिषदेत एक विचारलेल्या प्रश्नावर आपल्याकडे असलेल्या आमदार, खासदारांची संख्या सांगता आलेली नाही. योग्य वेळी सांगेन अस एक राजकारणात वापरून वापरून गुळगुळीत झालेल विधान शरद पवार यांनी केल आहे. त्यांच दुख: ऐकायला आता केवळ नेहमीचे चार लोक उरलेत हेच यातून स्पष्ट होत. अजित पवार यांनी कर्जतच्या सभेतून थेट शरद पवार हे कसे वागले, कशा पद्धतीन ते धरसोड करतात हे जाहीरपणे सांगितल.
भारतीय जनता पक्षाबरोबर जायला त्यांनीच सांगितल, पुण्यातील उद्योगपतीच्या घरी जेवणाच्या निमित्तानं झालेली बैठक वगैरे अस बरच काही अजित पवार बोलले होते. मात्र यावर शरद पवार यांनी चकार शब्द काढला नाही. उलट अजित पवार जे बोलले त्यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पहिल्यांदा कळाल्या अस ते बोलले. अजित पवार यांनी चर्चा केली होती अस ते म्हणाले पण अजित पवार ज्या रस्त्याने जाणार होते म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर जायचे अस ते म्हणत होते ते आम्हाला मान्य न्हवते हे सांगतना त्यांनी आम्ही लोकांना मत मागितली ती भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी मागितली नव्हती. असा निर्णय घेतला तर ति फसवणूक ठरेल अस शरद पवार म्हणाले. आता आम्हाला इथ एक प्रश्न पडतो तो म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने लोकांसमोर जाताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या विरोधात मत मांडून मत मागितली आणि लोकांनी किती मत दिली म्हणजे किती त्यांचे आमदार दोन्ही कॉंग्रेसचे निवडून आले ते आपण पहिले. म्हणजे दोन्ही कॉंग्रेसला लोकांनी राज्याची सूत्र दिली नव्हती. स्पष्ट बहुमत हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला दिलेल असताना मग शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन कॉंग्रेस आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी कशी बनवली ? तेव्हा आपण लोकांची फसवणूक करत आहोत अस त्यांना किवा त्यांच्या सहकार्यांना का वाटले नाही? त्यावेळीसुद्धा दोन्ही कॉंग्रेस शिवसेनेच्या विरोधातच बोलत होते.
अजित पवार यांच्यासह जे आज त्यांच्या बरोबर गेले त्यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर मत मागितली. पक्षाच तिकीट त्यांना देण्यात आलं होत अस शरद पवार आज म्हाणाले पण अजित पवार किवा त्यांच्या बरोबर गेलेले आमदार कधीच म्हणत नाहीत कि आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नाही. उलट त्यांनी मुळ पक्ष हा आमचाच असल्याचा दावा केला आहे म्हणून तर निवडणूक आयोगात रोज सुनावण्या सुरु आहेत. यापूर्वी पण अजित पवार यांनी काही खुलासे केले होते. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ यांनी शरद पवार काय म्हणाले होते ते सांगितले, सुनील तटकरे यांनी सांगितल आता ही सगळी मंडळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्या दिवसापासून शरद पवार यांच्या बरोबर आहेत. भुजबळ तर पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष. आता हे सगळेच खोट बोलत आहेत अस म्हणायचं का? पहाटेचा शपथविधी हा पक्षाच्या धोरणाचा भाग नव्हता अस जर शरद पवार म्हणत आहेत तर मग भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर कोणी बैठका केल्या होत्या. सरकार बनवायचे ठरवून ऐनवेळी कोणी शब्द फिरवला? मग अजित पवार यांनी कसा दिलेला शब्द पाळला हे छगन भूजबळ यांनी ऑन रेकॉर्ड सांगितल आहे, हे कस विसरून चालेल. यातून एका म्हशीला वैरण दाखवायची आणि १० म्हशीना कस हंबरत ठेवायच हे शरद पवार याचं राजकारण आपल्या लक्षात येत.
हे ही वाचा:
मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार
तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक
युजवेंद्र चहलच्या निवडीवरून हरभजन सिंगने बीसीसीआयला सुनावले!
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
पूर्वी कधी १९८० च्या दशकात असच शरद पवार यांचे आमदार मोठ्या प्रमाणावर त्यांना सोडून गेले होते त्यांच्या गटात केवळ सहा आमदार उरले होते त्यानंतर झालेल्या निवडनुकीत त्यातील कोणीही विधानसभेत आल नाही अस पवार नेहमी सांगतात. पण तो काळ वेगळा होता आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळच काल अजित पवार म्हणाले की काळानुरूप बदल करावे लागतात आणि तसे त्यांनी केले अजून शरद पवार हे १९८० मध्ये काय घडल होत हेच सांगत आहेत. झाल आता तो इतिहास झाला आहे. मतदार बदलले आहेत मतदारांची मानसिकता बदलेली आहे. हे अजित पवार यांनी नेमक हेरलं आणि त्यांनी निर्णय घेतला. आणि तो इतरांना मान्य होता म्हणूनच त्यांच्या बरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार गेले. त्यामुळ मगाशी म्हटल्याप्रमाण शरद पवार यांची अवस्था अरण्यरुदन झाली आहे. त्यांचे ऐकायला आता त्यांच्याकडे कोणी राहिलेल नाही.