22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणशरद पवारांची नवी भूमिका; पक्ष म्हणजे फक्त आमदार नाही तर संघटना

शरद पवारांची नवी भूमिका; पक्ष म्हणजे फक्त आमदार नाही तर संघटना

शरद पवार म्हणतात, देशात राष्ट्रवादी पक्षाची संघटना आहे.

Google News Follow

Related

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडलेली नसल्याचे वक्तव्य शरद पवारांनी शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी केले होते. अजित पवार आमचेच नेते आहेत असंही वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांनी वेगळी भूमिका घेत आपण असे म्हटले नसल्याचे म्हणाले. यानंतर शनिवार, २६ ऑगस्ट रोजी त्यांनी ‘टीव्ही ९’ ला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या फुटीवरही भाष्य केलं आहे.

“लोकांना कळत नाही. पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात. पक्ष म्हणजे संघटना असते. सदस्य असतात. देशात राष्ट्रवादी पक्षाची संघटना आहे. आमदार येतो आणि जातो. पण शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो. जे कोणी आमदार गेले असतील किंवा जाणार असतील, त्यांच्यावर संपूर्ण देशाची संघटना अवलंबून नाही. काल महाराष्ट्रात पक्षाचे प्रमुख होते जयंत पाटील. आजही जयंत पाटीलच आहेत,” अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.

“ज्या लोकांनी वेगळी भूमिका घेतली त्यांना प्रश्न विचारला, तुमच्या देशाच्या संघटनेचे नेते कोण? त्यांनी माझंच नाव सांगितलं, आता त्यांच्या लक्षात आलं की खरं बोलल्यावर आपल्या अंगलट येतंय. त्यावर काही तरी वेगळी भूमिका घ्यावी लागेल. पक्ष हा कुठे गेला नाही. काही लोक येऊन भेटतात, काही कामासाठी गेलो सांगतात. आम्ही आहोत सांगतात. आम्ही त्यांची तपासणी केली नाही. पण आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष नाही,” असं शरद पवार म्हणाले.

पक्ष फुटला नाही असं म्हणता मग निवडणूक आयोगाकडे जाण्याचं कारण काय? असा सवाल करताच ते म्हणाले की, “पक्ष एकाबाजूला असेल तर वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. निवडणूक आयोगाबाबत सांगता येणार नाही. केंद्रात सत्तेत जे बसले आहेत. त्यांचा प्रभाव निवडणूक आयोगावर किती आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात.”

सध्या २०२४ चा विचार करत आहोत. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीचा वापर करणार आहोत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट असणार आहेत. त्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे तसेच महत्त्वाचे पक्ष असणार आहेत. त्यांना सोबत घेऊन लोकांसमोर जाणार आहोत, असंही शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू

भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत

तेलंगणाची ‘सूरही’ ते नागालँडची ‘शाल’, ब्रिक्स परिषदेतील नेत्यांना मोदींकडून भेट !

अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही!

निवडणूक सर्वेक्षणाबद्दल त्यांना विचारलं असता आपण निवडणुकीचा सर्व्हे पाहिला नाही, असं शरद पवार म्हणाले. सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष काम केलं आहे. लोकांमध्ये जातो तेव्हा लोकांचे चेहरे काही सांगत असतात. अनेक निवडणुका लढलो आहे. पहिली निवडणूक ५६ वर्षांपूर्वी लढली आणि त्यानंतर १४ निवडणुका लढल्या. क्वचित अपयश आलं. पण व्यासपीठावर उभं राहिल्यावर तुम्हाला लोकांचे चेहरे वाचता आले पाहिजे. सध्या महाराष्ट्राचा मूड असा दिसतोय की, लोकांना बदल हवाय. लोकांना महाराष्ट्रात भाजपच्या हातात सत्ता द्यायची नाही. अशी मानसिकता लोकांची दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा