“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

जरांगे यांना येणाऱ्या ‘त्या’ फोन विषयी मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी केली पोलखोल

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगे पाटलांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले. त्यांच्या पाठोपाठ आता आणखी एका मराठा आंदोलक महिलेने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे नेते शरद पवार यांचा हात आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक महिला संगीता वानखेडे यांनी केला आहे. यासुद्धा जरांगे यांच्या सहकारी होत्या.

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं आहे. दंगल घडली का घडवली याचा सरकारने शोध लावावा, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता, असा दावा त्यांनी केला आहे. शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, असा आरोप करत त्यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही संपूर्ण पुणे फिरलो. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, अशी टीका संगीता वानखेडे यांनी केली आहे.

संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात कार्यरत होत्या. त्या असंही म्हणाल्या की, “मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु, खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी जरांगे यांना विरोध करत आहे.”

हे ही वाचा:

पहिल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील आंदोलकांनी आमच्या मुलांना व्यसनी केले!

आंध्र प्रदेशात सर्वाधिक ‘लखपती दीदी’

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

चीनचे सैन्य गुंडगिरीसाठी उभे!

दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अजय महाराज बारसकर यांनीही मनोज जरांगे यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले की, “मनोज जरांगे यांना अध्यादेश, अधिनियम यामधील फरक कळत नाही. अधिकाऱ्यांशी ते खालच्या भाषेत बोलतात. लोकांची फसवणूक करत असून अनेक कुटुंबांना त्यांनी उध्वस्त केले आहे. जरांगे हे हेकेखोर आहेत. यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. १० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाची मंजुरी घेतली नाही. आधी ठरते वेगळे आणि माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात,” असा गंभीर आरोप करत अजय महाराज यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

Exit mobile version