शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही

शरद पवारांच्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची एक सीट जिंकता आली नाही

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल जाहिर झाले. यात तृणमुल काँग्रेसला बहुमत मिळाले. मात्र महाराष्ट्रातील काही नेत्यांनी यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अदृश्य हात असल्याची मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. निलेश राणे यांनी या सर्वांचा समाचार घेतला आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयामागे शरद पवार यांचे अदृश्य हात असल्याचा साक्षात्कार महाराष्ट्रातील काही नेत्यांना झाला होता. त्यांना चोख प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी ट्वीट केले आहे की,

पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यामुळे ममता बॅनर्जी बंगाल मध्ये जिंकल्या असं काही जण म्हणतायत पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची एक सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या या योजनेमुळे २ लाखांपर्यंतचे सुरक्षा कवच

महाराष्ट्रातील कोविड रुग्णवाढ ५० हजारांखाली

तृणमुलच्या नृशंसांचे कुत्र्याच्या पिल्लांना मारण्याचे घृणास्पद कृत्य

आयपीएलमध्ये शिरला करोना

पश्चिम बंगालसोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाची पोटनिवडणुक देखील याच कालावधीत पार पडली होती. या निवडणुकीचा निकाल देखील २ मे रोजीच लागला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणुक पार पडली. भरत भालके यांचेच सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तर भाजपाने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उतरवले होते. ही निवडणुक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असल्याने दोन्ही पक्षांकडून पूर्ण ताकद लावण्यात आली होती. भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे हे या निवडणुकीत विजयी झाली. बंगालच्या विजयासाठी कारणीभूत असलेल्या ‘अदृश्य हातांना’ पंढरपूरची ही एक सीट काही जिंकता आली नाही. त्यामुळेच अदृश्य हात कारणीभूत असल्याच्या बाता केवळ वल्गना असल्याचे स्पष्ट झाले.

Exit mobile version