महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर नाहीत, कोणता पक्ष अव्वल ठरेल हे ठोस कोणीही सांगू शकत नाही, तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आतापासूनच राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण?, यावर भाष्य केल जात आहे. यामध्ये महिला देखील मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असल्याचे बोलले जात आहे. महिला मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळेंच्या चर्चा होत आहे. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या नावावरून भाजप नेत्याने शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांची सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्याची योजना असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्री पद मिळावे, रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे यासाठी सक्षम असल्याचे काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले. परंतु, प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रक्रिया असते पक्षातील आमदार निवडून आल्यानंतर हा निर्णय घेतला जातो. दिल्लीमध्ये आतीशी यांना मुख्यमंत्री पद दिल्यानंतर अशी चर्चा सुरु झाली की, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री द्यावं आणि वेगळा इतिहास रचावा, असे गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नाव समोर येताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार टीका केली आणि मविआला टोलाही लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्याची योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रात मविआत एकूण ११ मुख्यमंत्री फिरत आहेत, याची मला माहिती आहे. परंतु, शरद पवारांची जिद्द आहे, काहीही झालं तरी ऐकायचं नाही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचेच, असे बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा :
मागाठाणेतून अमित ठाकरेंना मैदनात उतरवण्यासाठी मनविसेने कंबर कसली
मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन
‘एक देश, एक निवडणूक’ला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ग्रीन सिग्नल!
गणेश उत्सवात जिहाद्यांकडून ११ ठिकाणी हल्ले
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याच्या जनतेचे लक्ष लागून आहे, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट पडून आमदार, मंत्री, कार्यकर्ते विभागले गेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांना देखील भारी पडण्याची शक्यात वर्तवली जात आहे.