महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने एक्सवर पोस्ट शेअर करत या उमेदवारांची माहिती दिली आहे. वाईमधून अरुणा देवी पिसाळ यांना संधी देण्यात असून काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी सात उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. चौथ्या यादीत माण, काटोल, खानापूर, वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा या मतदारसंघांचा समावेश आहे. यापूर्वी पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत नऊ आणि आता चौथ्या यादीत सात उमेदवरांची घोषणा केली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल देशमुख यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनिल देशमुख यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून यंदा मुलगा सलीलला उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षनेतृत्वाकडे विनंती करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, आता त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे.
“मी यंदा निवडणुकीसाठी पुन्हा उभा राहिलो असतो तर पूर्ण नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभं न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार माहाविकास आघाडीचेचं येणार आहे. त्यानंतर शरद पवार मला पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार बनवती, तसेच ते मंत्रिमंडळातही घेतील, मात्र त्यासाठी सलीलला विजयी करावे लागेल,” असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद घेत एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज
‘वारी एनर्जी म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भर!’
मारुतीचे दर्शन घेत अजित पवार, युगेंद्र पवारांनी बारामतीतून केले अर्ज दाखल
ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड
चौथ्या यादीत शरद पवारांनी माण येथून प्रभाकर घार्गे, काटोलमधून सलील देशमुख, खानापूर येथून वैभव सदाशिव पाटील, वाई येथून अरुणादेवी पिसाळ, दौडमधून रमेश थोरात, पुसद येथून शरद मेंद आणि सिंदखेडामधून संदीप बेडसे यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले आहे.