शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब

शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब

“शरद पवारांचा वसुली एजन्ट अनिल देशमुख तर उद्धव ठाकरेंचा अनिल परब.” असा घणाघाती आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुख यांनी ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईवरुन किरीट सोमय्या यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांची २०१० ची मालमत्ता ईडीने शोधून काढली आहे. आता हळूहळू २०२० आणि २०२१ ची मालमत्ताही सापडेल, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

अनिल देशमुख यांनी हा काळा पैसा आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये गुंतवला होता. त्यावर ईडी लवकरच कारवाई करण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हा सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करायचा. त्यानंतर परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यासाठी काम करायचा, असा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार यांचे वसुली एजंट अनिल देशमुख आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे एजंट अनिल परब असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्वच नको

मुंबईत पुन्हा महापालिकेचे काम ‘चव्हाट्यावर’

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?

अनिल देशमुख आणि अनिल परब हे दोघेही एकदिवस तुरुंगात जाणार, असा दावा सोमय्या यांनी केलाय. अनिल देशमुख सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत वाचण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हाकलून दिलेल्या नंतर त्यांना ईडीकडेच जावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की, हायकोर्टाने सांगितलं आहे की तपासाची व्याप्ती वाढवा. तर दुसरीकडे राज्य सरकार, अनिल देशमुख रोज एक पिटीशन टाकत आहेत आणि तपास थांबवा असं सांगत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version