25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणशरद पवार प्रचंड बहुमताने विजयी; मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक

शरद पवार प्रचंड बहुमताने विजयी; मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय निवडणूक

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे जिंकली. केवळ ३४ मतदारांच्या या निवडणुकीत शरद पवार यांना २९ मते पडली तर त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या धनंजय शिंदे यांना २ मते पडली. उमेदवारांना आपले मत टाकण्याचा अधिकार नसलेल्या या अनोख्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पवार गटातील उमेदवारही मोठ्या फरकाने जिंकले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. १९९२पासून शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, पण प्रथमच या संस्थेत निवडणूक पार पडली. यावेळी धनंजय शिंदे या सर्वसामान्य अशा सदस्याने पवारांविरोधात दंड थोपटले होते. घटनाबाह्य पद्धतीने निवडणूक घेतली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यासाठीच त्यांच्या गटातील सर्वांनी काळ्या फिती बांधून याचा निषेधही केला होता.

या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी १४ उमेदवार होते. त्यातील विद्या चव्हाण, शशी प्रभू, भालचंद्र मुणगेकर हे शरद पवार गटाचे कट्टर समर्थकही बहुमताने विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीतील विजयी सदस्य असे- विद्या चव्हाण, प्रभाकर नारकर, शशी प्रभू, अरविंद सावंत, प्रदीप कर्णिक, अमला नेवाळकर, भालचंद्र मुणगेकर. अपेक्षेप्रमाणे धनंजय शिंदे यांच्या गटातील सगळ्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यात संतोष कदम, रजनी जाधव, आनंद प्रभू, प्रमोद खानोलकर, झुंजार पाटील, संजय भिडे, सुधीर सावंत यांचा समावेश होता.

या निवडणुकीची चर्चा गेले काही दिवस सुरू होती ती म्हणजे शरद पवार या निवडणुकीत उभे असल्यामुळे. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशी विविध पदे भूषविलेले शरद पवार या निवडणुकीत का उभे आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.

या निवडणुकीत संस्थेच्या घटनेची मोडतोड करून निवडणूक घेतली गेल्याचा आरोप धनंजय शिंदे यांनी केला होता. उमेदवारांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकारच नव्हता. शिवाय, जे ६ हजार सदस्य आहेत त्यांनाही मतदानाचा अधिकार नव्हता. तीन वर्षांचा कार्यकाल असतानाही ही निवडणूक पाच वर्षांच्या कार्यकालासाठी घेतली गेल्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला. त्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली होती, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

 

हे ही वाचा:

झोमॅटोच्या ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची

‘वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आलेली नाही’

नियमांत राहा! व्हॉट्सऍप, फेसबुकला केंद्र सरकारने पुन्हा फटकारले!

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

 

मुंबई उच्च न्यायालयातही धनंजय शिंदे यांनी धाव घेतली होती पण याविषयी निर्णय घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले होते. धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती न देता नंतर याविषयीचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, अशी सूचना केली.

प्रचंड पोलिस बंदोबस्त

या निवडणुकीसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तीन पोलिस व्हॅन या निवडणुकीच्या दिमतीला देण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी पोलिस उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा