राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत अजित पवार यांच्या कुटुंबियांवर घालण्यात आलेले आयकर खात्याचे छापे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर केलेले आरोप, लखीमपूरमधील घटनेनंतर झालेला महाराष्ट्र बंद या सगळ्या मुदद्यांवर ते बोलणार आहेत का, याविषयी अंदाज व्यक्त केले जात आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या घरावर आयकर खात्याचे छापे पडले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार पत्रकारांसमोर बोलणार का, हे दोन वाजता स्पष्ट होईल.
त्याशिवाय, माजी आमदार माणिकराव जाधव यांनी पवार कुटुंबियांवर घणाघाती आरोप केले आणि साखर कारखान्यांच्या व्यवहारात कसा घोळ घातला गेला, हे सविस्तर सांगितले. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष्य झाली आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. त्याविषयीही सोमय्या नवी माहिती देणार आहेत. शिवाय, याचसंदर्भआत मागे कोल्हापूरला जाणार असताना सरकारने त्यांना स्थानबद्ध केले होते. त्यावरूनही गदारोळ उडाला होता.
हे ही वाचा:
मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…
‘महात्मा गांधींच्या सूचनेवरून सावरकरांनी केली होती दयायाचिका’
पुणे हादरले! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या
महाराष्ट्र बंद, कोळसा आणि वीजपुरवठा अशा मुद्द्यांवरूनही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका झाली होती, त्यावरून पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडेही लक्ष आहे.