अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही या मुद्द्यावर शरद पवार यांनी भाष्य केले होते. यावरून बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं. अयोध्येतील राम मंदिराचा भाजपाला निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांना प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, तो विषय आता लोकांच्या ध्यानीमनी नाही. तसेच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांना एका बैठकीत काही महिलांनी तक्रार केली होती की भाजपाचे लोक श्री रामांचे सगळं करतात, पण मंदिरात सीतेची मूर्ती का बसवत नाहीत?
हे ही वाचा:
‘संपूर्ण जगाने पाहिली आहे मोहम्मद शमीची कमाल’
मतदान केंद्राच्या शौचालयात मृतावस्थेत आढळून आला सीआरपीएफ जवान!
प. बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेक
‘आप’ आमदार अमानतुल्लाह खान यांच्या अटकेचे वृत्त खोटे; चौकशीनंतर दिले सोडून!
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, “राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं, जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल,” अशी तिखट शब्दात शरद पवार यांनी टीका केली आहे.
राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात.
शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 19, 2024