राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवार, २४ जानेवारी रोजी पवारांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती उघड केली.
“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी” असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शरद पवार यांना कोरोना लागण झाल्याची माहिती मिळताच राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा:
रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार
व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी
कर्नाटकच्या शाळेत नमाज पढण्याचे प्रकरण तापले… हिंदू संघटनांचे चौकशीचे आदेश
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्राचे मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सर्वांनी शरद पवारांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तर माझी प्रकृती ठीक असून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व आवश्यक ती खबरदारी घेत आहे असे पवार यांनी म्हटले आहे.