25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारणजनादेशावरून कोण करतंय ठणाणा ?

जनादेशावरून कोण करतंय ठणाणा ?

Google News Follow

Related

राजकारणात पराभव किती जीवाला लागतो बघा. तो पराभव म्हणजे आता आपल्याला किमान पाच वर्ष तरी सत्तेची छडी हातात धरता येणार नाही. तामझाम नसणार आणि हुकुम सोडता येणार नाही. सत्तेची फळ चाखायला मिळणार नाहीत याबद्दलची ती चिडचिड असते. आणि ही चिडचिड गेल्या आठवड्याभरापासून आपण बघत आहोत. निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीचा हा थयथयाट सुरु आहे. त्यात कोण मागे नाही. त्यातही स्पर्धा लागली आहे. असो विषय सांगायचा म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीवर टीका करताना जनादेशाचा मान ठेवता आला नाही अजून सरकार बनले नाही असे म्हटले आहे. आता हे कोण बोलतय तर शरद पवार.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जर आपल्याला आठवत असेल तर या राज्याचा स्पष्ट जनादेश कोणाच्या बाजूने होता आणि त्या जनादेशाचा अपमान कसा झाला हे देशान बघितले आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळची अखंड शिवसेना यांनी निवडणूक एकत्र लढली. राज्याच्या जनतेने याच युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. पण या बहुमताचे कसे मातेरे झाले आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार कस स्थापन झाले, त्याचे नेतृत्व कोण करत होते हे अजून महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. ज्यांनी जनादेशालाच किंमत दिली नाही. सरळ सरळ जनादेशाचा अपमान केला त्यांनी जनादेशाचा अपमान ही महायुती करत आहे असे बोलत आहेत. याचा अर्थ काय तर आपण हरलोय, जनतेने आपल्याला नाकारले आहे हे अजून पटतच नाही. किंवा माहित असून देखील मन तयार होत नाही त्यामुळे ही सगळी चिडचिड सुरु आहे.

हे ही वाचा:

अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते ?

कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी

तेलंगणामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा

पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स

 

निवडणूक हरल्यापासून इव्हिएम मशीन आणि निवडणूक आयोग यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. आज तर खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांना या प्रकारात ओढले आहे. म्हणजे या सगळ्या महाविकास आघाडीमधील नेत्यांना काय करू आणि काय नको असे झाले आहे. सत्ता चुकून माकून आली असती तर काय केल असत देव जाणे. संगीत मानापमान हे नाटक आपल्याला माहिती आहे. पण राजकारणात सुद्धा अस एक नाटक जन्माला आले होते ते २०१९ मध्ये. फार काळ ते चालल नाही अडीच वर्षातच गाशा गुंडाळावा लागला. कारण त्यातल्या भूमिका कसदार नव्हत्या. मुळात ते नाटक तयार करण्यात आले होते. ओढूनताणून. ओढूनताणून केलेली कोणतीही गोष्ट दीर्घकाळ चालत नाही हा निसर्गाचा नियम आहे. आणि इथेतर जनादेशचा विषय होता. स्पष्ट जनादेश युतीच्या बाजूने असताना जनादेश झुगारून लोकांच्या मताचा अपमान करून आपण सरकार बनवल. हे बहुदा नेहमीप्रमाणे शरद पवार विसरलेले दिसतात. त्यामुळे ते आज महायुतीला दुषण देत आहेत.

सत्ता महायुतीची येणार ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. आता तीन पक्षाची आघाडी म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. व्यवस्थित सरकार बनवल जाणार. त्यात मोठा पक्ष भाजप ठरला आहे त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे पण निश्चित आहे. त्यात देवाभाऊ शिवाय दुसर नाव समोर दिसत नसल्यामुळे सुद्धा महाविकास आघाडीकडून सतत मळमळ बाहेर पडतीय. कारण २०१४ ते २०१९ या पाच वर्षातील देवाभाऊचा कारभार सगळ्यांनी बघितला नाही तर अनुभवला आहे. माग एकदा एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गोष्ट बोलून दाखवली होती. जर २०१९ ला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमचे पक्ष शिल्लक राहतील का नाही अशी परिस्थिती झाली असती असे स्पष्ट सांगितले होत. आज त्याचीच चिंता लागली आहे. त्यामुळे रोज नवीन काहीतरी हत्यार बाहेर काढायचं आणि लोकांच्या पुड्या सोडून संभ्रम निर्माण करायचा याच उद्देशाने महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. त्याचा काही परिणाम सामान्य मतदारावर होणार नाही. त्याचे कारण असे आहे की याच सामान्य मतदारांनी या सरकारची निवड केली आहे. आणि काहीही झाले तरी याखेपेला दगाफटका होऊ नये याची काळजी सुद्धा याच मतदारांनी घेतली आहे. काळजी इतकी घेतली आहे की विरोधी पक्षनेता सुद्धा महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाचा होणार नाही इतकेच आमदार निवडून दिले आहेत.

खरतर रोज उठून यावर आपापल्या पक्षातील नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका या नेत्यांनी घेतल्या पाहिजेत. कुठे आपली चूक झाली. काय नेमक चुकल. का मुख्यमंत्री पदाच्या मोहासाठी पाडापाडीचे राजकारण झाले याबद्दल चिंतन, मनन करायला पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नाही त्याबद्ल बोलून काय उपयोग. कारण तो महायुतीचा प्रश्न आहे. आणि काळजीवाहू मुख्यमंत्री या राज्याला आहेत. सरकारने राज्य वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यापेक्षा प्रमुख म्हणून राज्यपाल आहेतच. त्यामुळे यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजिबात चिंता करण्याचे कारण नाही. महायुतीमध्ये व्यावस्थितीत ताळमेळ आहे. उलट जनादेशाचा अपमान करून जे सरकार २०१९ मध्ये स्थापन झाले त्यावेळी किती वेळ लागला होता. निर्णयच होत नव्हता. कितीतरी दिवस आमदार हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ आली होती. हे विसरता येणार नाही. आजची एक तारीख गेली आहे. पाच तारखेला या सरकारचा अगदी दिमाखदार शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे आणि राज्याला स्थिर सरकार मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे राज्याच्या विकासाचा अश्वमेध सुसाट धावणार आहे हे मात्र नक्की.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा