शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील

अजित पवार हे आमचेच नेते आहेत, त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणून पक्षात फूट पडली, असं होत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून शरद पवारांच्या विधानावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

“वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरिता योजना अशा अनेक योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात घेतलेले निर्णय आणि आता वर्षभरात घेण्यात येणारे निर्णय पाहून शरद पवारांचे लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल. त्यानंतर अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं गुरुवारी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिला. बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विधानाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “अजित पवार आमचे आहेतच, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर तर, आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, वेगळी भूमिका घेतली लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणण्याचं काही कारण नाही हा त्यांचा निर्णय आहे,” असे शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

… म्हणून जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवले

शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत अल्लू अर्जुन, आलिया भट्ट सर्वोत्तम

सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये नेमकं काय चाललं आहे असा सवाल आता महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना पडू लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version