लोकसंख्येबाबतच्या योगींच्या कायद्याला पवारांचा पाठिंबा; आता इतर पक्षांचे काय?

लोकसंख्येबाबतच्या योगींच्या कायद्याला पवारांचा पाठिंबा; आता इतर पक्षांचे काय?

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील भाजपा सरकारने तेथे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर देशभरात या विषयावरुन चर्चा सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांनी हा पाठिंबा दिल्यामुळे आता बाकी भाजपेतर पक्षांची भूमिका या विषयावर काय असणार, हे पक्ष शरद पवारांच्या सुरात सूर मिसळण्यास तयार होणार का, याबद्दल आता उत्सुकता आहे.

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं, “लोकसंख्या वाढल्यास काय नुकसान होतं याबद्दल प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. वाढती लोकसंख्या अनेक प्रश्नांचं मूळ आहे. यामुळे समाजात विषमता पसरते. चांगल्या समाजासाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक आहे. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रत्येकाने लोकसंख्या नियंत्रणाची शपथ घेतली पाहिजे.”

हे ही वाचा:

… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार

विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत

१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट

ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!

भाजपा सरकारच्या निर्णयाचा आणि त्यातही कट्टर हिंदुत्ववादी नेते मानले जाणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या निर्णयाचं समर्थन शरद पवारांनी केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. उत्तर प्रदेशचे कायदा आयुक्त मित्तल यांनी म्हटले आहे की, जे लोक उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यानुसार दोन मुलांबाबत आग्रही असतील त्यांनाच सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. इतर पक्ष देखील लोकसंख्या नियंत्रणाला पाठिंबा देतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. शरद पवार म्हणाले, “जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नागरिकांनी लोकसंख्या नियंत्रणात आपलं योगदान देण्याची शपथ घ्यायला हवी. उत्तम देश आणि चांगलं जीवनमानासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.”

Exit mobile version