राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रा नुसार आपल्याला कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या संदर्भात कोणतीही माहिती नसून हा हिंसाचार कोणावरही आरोप नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कोरेगाव भीमा दंगलीच्या तपासकार्यात नवे वळण घेण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे विधान केले होते. त्यानंतर या प्रकरणात वकील असलेले प्रदीप गावडे यांनी शरद पवार यांची साक्ष नोंदविण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ५ मे रोजी शरद पवार यांचा या प्रकरणात जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पण त्या आधीच आपल्याला या प्रकरणा बाबत काहीही माहित नसल्याचे शरद पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेच्या मागे कोणताही राजकीय हेतू किंवा अजेंडा असण्याविषयी माझा कोणावरही आरोप नाहीत असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
कारागृहात असताना रवी राणा यांचा वाढदिवस साजरा
केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ
ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
तरी या प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी अनेक कायद्यातील तरतुदीं विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत यामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याचा ही समावेश आहे इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली देशद्रोहाचे कलम सध्या सरकारवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात वापरले जाते असे पवार यांनी म्हटले आहे त्यामुळे या कलमा बाबत पुनर्विचार करण्याचे मत ही शरद पवार यांनी मांडले आहे.
२०१८ साली १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. राज्य सरकारने या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र आयोग नेमला असून या आयोगाचे कामकाज सध्या सुरू आहे. ५ मे रोजी शरद पवार हे या आयोगासमोर हजर राहून आपली साक्ष होणार असल्याची माहिती मिळत आहे.