सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता. मात्र, आता वाईन विक्रीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्याने निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे काही कारण नाही.

शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असे वक्तव्य केल्यामुळे आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय पुन्हा बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य सरकारच्या या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला असून सरकारवर निशाणा साधला होता.

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच ‘हा फार चिंताजनक विषय असल्याचं मला वाटत नाही. तरी काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टीकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसं वावगं ठरणार नाही,’ असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द

मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा

क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

राज्यातील निर्बंध शिथिल; काय आहे नवी नियमावली?

नुकताच काही दिवसांपूर्वी किराणा दुकानांमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यावरून भाजपा नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

Exit mobile version