…म्हणे तीन राज्यांत निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात हिंसाचार

…म्हणे तीन राज्यांत निवडणुका असल्यामुळे महाराष्ट्रात हिंसाचार

शरद पवार यांनी फोडले खापर

शरद पवार हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी (१५ नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी बोलताना काही मुद्द्यांवर संवाद साधला. त्रिपुरा येथील हिंसाचार विषयी बोलताना ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये घडले म्हणून महाराष्ट्रात असे घडणे योग्य नाही. त्रिपुरामध्ये जे घडले त्याबाबत काही व्यक्तींनी त्या ठिकाणी काही घडले नसल्याचे सांगितले. समजा तिथे काही घडलं असे जरी आपण गृहीत धरलं तरी, तिथे घडल मग राज्याच्या चार ठिकाणी हिंसाचार होण्याची गरज नाही.

तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असून यात सामान्य माणूस भरडला जात आहे. काही राजकीय पक्षांना आलेल्या नैराश्यातून अशा प्रकारे सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असे वर्तन केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय

अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्रिपुरामधील कथित घटनेचे हिंसक पडसाद महाराष्ट्रात दिसून आले. या घटनेला राजकीय वर्तुळात वेगळेच वळण मिळाले असून दरम्यान आज काही भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. भाजप नेते, माजी मंत्री अनिल बोंडेंसह अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांना अटक केली आहे.

Exit mobile version