ईडी, सीबीआय, आयकर, एनसीबी अशा केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातील राग शरद पवारांनी पुन्हा एकदा आळवला आहे. आयकर खात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे मारल्यानंतर शरद पवारांनी दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन या सरकारी यंत्रणांवर रोष व्यक्त करत त्यांचा दबावासाठी वापर केला जात असल्याची ओरड केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज (१६ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. शरद पवार यांनी वक्तव्य केले की, ‘दीड- दोन वर्षांपूर्वी ईडी, एनसीबी कोणालाही माहित नव्हती.’
‘दीड- दोन वर्षांपूर्वी ईडी, एनसीबीबद्दल कोणाला कल्पनाही नव्हती’, असे शरद पवारांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. एनसीबी आडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. ‘चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. माझ्या घरीही येऊन ते चौकशी करु शकतात. पण चौकशी केल्यानंतर आणि त्यांचे काम संपल्यानंतर तिथे थांबू नये.
हे ही वाचा:
लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात
महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?
नवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. काही ठिकाणी ही छापेमारी आठवडाभर चालली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच ईडी आणि आयकर विभाकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जातो. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनीही प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले होते, ज्यांनी गैरव्यवहार केले आहेत तिथे या संस्था पोहचतात. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते या एजन्सीचा गैरवापर कधीही केला जाणार नाही. मात्र, भ्रष्टाचार खणून काढूच असे फडणवीस म्हणाले होते.