शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर भाष्य केले आहे.
मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अशा प्रकारची बंडाळी झाली होती, असं शरद पवार म्हणाले. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं, असेही शरद पवार यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी उत्तर देण्याचे टाळत सेन्सिबल प्रश्न विचारा असं पत्रकारांना म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘परिस्थितीला सामोरे जाण्याची शिवसेनेत धमक नाही’
“एकनाथजी योग्य निर्णय नाहीतर आनंद दिघे झाला असता”
“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”
‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’
एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चालू आहे. आत्ता विधानपरिषदेलाही क्रॉसवोटिंग झालं. ते नेहमी होतं. मात्र सरकारला काही धोका नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.