राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच फटकारले आहे. शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तो लगेचच मागेही घेतला. यासंदर्भात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं होते. यावरून शरद पवारांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार हे राजकीय वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याची टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली होती. यावर शरद पवारांनी संजय राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत. “आम्ही काय केले हे संजय राऊत यांना माहिती नाही. हा आमच्या घरातील प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नेत्यांना संधी देऊन मंत्री केले आहे. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहीर करत नाही, तसेच कोणी आमच्यावर टीका केली तरी आम्ही दुर्लक्ष करतो,” अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
हे ही वाचा:
युद्धाचे ढग गडद! रशियाचा युक्रेनवर ड्रोन हल्ला
सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकांची मालमत्ता ईडीकडून जप्त, ‘या’ प्रकरणात केली कारवाई
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
मेक इन इंडियाची भरारी!! पहिले एअरबस C295 भारताच्या ताफ्यात येणार
“आम्ही कधी प्रसिद्धी करत नाही. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे,” अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे.