24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणअदानींना लक्ष्य केले गेले, हिंडेनबर्गच्या आरोपांना नको तितके महत्त्व दिले गेले -...

अदानींना लक्ष्य केले गेले, हिंडेनबर्गच्या आरोपांना नको तितके महत्त्व दिले गेले – इति शरद पवार

पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या संंबंधांवरून रान उठविणाऱ्या विरोधकांना पवारांची चपराक

Google News Follow

Related

देशातील अनुभवी आणि मुरलेले राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव न घेता हिंडेनबर्गच्या आरोपांना अतिमहत्त्व दिले गेल्याचे म्हटले आणि अदानी यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले गेले, अशी टिप्पणीही  केली. शरद पवार यांनी ही टिप्पणी केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींच्या मुद्यावर स्पष्ट भूमिका घेतली. ते म्हणाले की,  विदेशी कंपनीने काही वक्तव्य केले देशात त्यामुळे हंगामा झाला. यापूर्वीही तसे झालेले आहे. पण यावेळी त्याला महत्त्व दिले गेले आहे. हे मुद्दे ठेवणारे कोण आहेत याचा विचार व्हायला हवा. ज्यांनी आरोप केले त्यांचे नाव (हिंडेनबर्ग) आपण कधी ऐकले नव्हते. त्याची पार्श्वभूमी काय आहे. जे मुद्दे उपस्थित करतात त्याची किंमत देशाला किती चुकवावी लागते, याचा विचार व्हायला हवा होता. या गोष्टी विसरायला नको होत्या. इथे (अदानींना) टार्गेट केले जाते असे वाटते. अदानी यांनी काही चूक केली असेल तर चौकशी करा. पण उद्योजकांचे काम देशाच्या विकासात योगदान देणे. असे आरोप उद्योगपतींच्या विरोधात जातात.

आम्ही टाटा-बिर्लांविरोधात बोलत असू पण नंतर चूक कळली!

शरद पवार म्हणाले की, उद्योगपतींच्या विरोधात काँग्रेस आहे असे वाटत नाही. आम्ही राजकारणात आलो तेव्हा सरकारविरोधात बोलायचे तेव्हा आम्ही टाटा बिर्लाविरोधआत बोलत असू. समजूतदार झालो तेव्हा टाटा बिर्ला यांचे योगदान लक्षात आले तेव्हा कळले की का आपण टाटा बिर्लांना विरोध का करत होतो? पण करायचे म्हणून आम्ही लक्ष्य करत असू. पण आज सरकारवर हल्ला करायचा असेल तर अंबानी अदानी ही नावे पुढे आलीत. जर चुकीचे काही केले तर त्यविरोधात बोलण्याचा अधिकार नक्कीच सगळ्यांना आहे. पण कोणतीही नीट माहिती न घेता हल्ला करणे समजण्यापलिकडे आहे. अंबानींचे उद्योगक्षेत्रात योगदान आहे. वीज क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. वीजेची आवश्यकता देशाला आहे की नाही? जर देशाच्या अर्थव्यवस्थेला लाभ होईल, अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांवर टीका करणे योग्य वाटत नाही.

संसदेत कामकाज झालेले नाही, त्याबद्दलही शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, या आधीही संसदेत कामकाज न होण्याच्या घटना घडल्या आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. मी सरकारमध्ये होतो. २ जीच्या घोटाळ्यावर काही तास सत्र वाया जात होते. पण ते होत असताना आम्ही सगळे एकत्र बसत होतो. मतभिन्नता असू शकते पण संसदेसारखे व्यासपीठ लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आवश्यक आहे. पण ते व्यासपीठ उपयोगात येत नसेल आणि लोकांचे प्रतिनिधी असे करत असू तर ठीक नाही. पवार म्हणाले की, आम्ही दोन्ही सभागृहात सदनाचे कामकाज चालू दिले गेले नाही. त्यानिमित्ताने हंगामा झआला. सरकारच्या धोरणांवर टीका होऊ शकते. पण त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. संवाद हवा. तो नजरअंदाज केला जात असेल तर सिस्टीमला धोका पोहोचेल.

शरद पवारांनी सांगितले की, काही मुद्दे वैयक्तिक झाले आणि चांगले मुद्दे नजरअंदाजही केले गेले. सदनात कोणत्या मुदद्यावर चर्चा व्हायला पाहिजे, देशवासियांपुढे कोणत्या समस्या आहेत. कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी. असे मुद्दे नजरअंदाज करणे योग्य नाही. तसे होत असेल तर आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत.

हे ही वाचा:

३ हजार शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत होणार दाखल

फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत

महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही करणार सलमान खानचे संरक्षण

‘१५ कोटी रुपयांसाठी केजरीवाल १५ कोटींचे तूप असा शब्द वापरतात’

याचा दोष कुणाला द्यायला हवा या प्रश्नावर पवार म्हणाले की, कुणा एका पक्षाला दोष देता येणार नाही. सगळे पक्ष आहेत. पण त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मागे पडले. कुणीतरी (हिंडेनबर्ग) रिपोर्ट घेऊन येतो आणि देशाचा तो महत्त्वाचा मुद्दा होतो. गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम होतो. शेवटी पायाभूत सुविधांना नजरअंदाज करता  येत नाही. मुंबई विमानतळाचा आकार वाढवणे, विकास करणे याची आवश्यकता आहे. मुंबई देशातील मुख्य आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. त्याच्या विकासासाठी काही पावले उचलली पाहिजेत. त्या मार्गात आडवे येणे योग्य नाही. पायाभूत सुविधा हव्यात. महाराष्ट्रात काही ठिकाणी कोस्टल रोड बनवले जात आहे. प्रभावी संपर्कासाठी ते आवश्यक आहे. हायवे, विमानतळ सगळ्यांनाच लाभ होणार आहे. हायवे, पोर्ट, एअरपोर्ट, धरणे असोत, त्यांची आवश्यकता आहे. त्यात आडवे येणे योग्य नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा