राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काश्मीर फाईल्स या चित्रपटा विरोधात आपली मळमळ व्यक्त केली आहे. काश्मीर पेक्षा भयाण हिंसा गुजरातमध्ये झाली होती असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स चित्रपट देशभर सुपरहीट ठरला आहे. तिकीटबारीवर या चित्रपटाने धुवाधार कमाई केली आहे. तरी देखील या चित्रपटाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या चित्रपटावर टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यात आघाडीवर राहिले आहे. त्यांनी आत्तापर्यंत या चित्रपटाच्या विरोधात अनेकदा मत प्रदर्शित केले आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर
शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण
गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा
याबद्दल केलेल्या ताज्या विधानात पवारांनी काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांपेक्षा गुजरात मधील हिंसाचार अधिक गंभीर असल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये झालेली हिंसा भयाण होती. रेल्वेचे डबे पेटवले होते. शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते. पण त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले ऐकिवात नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या टीकेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट काढला आहे. पण ही घटना कधी घडली हे देखील पाहिले पाहिजे. या चित्रपटाच्या मांडणीतून अन्य धर्मीयांच्या माणसांबद्दल संताप येईल, काही लोकांनी कायदा हातात घ्यावा तसेच गणित करायचे तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो असा संशय त्यांनी व्यक्त केला. काश्मीरमधून पंडित बाहेर पडले तेव्हा राज्यकर्ते कोण होते? तेव्हा काँग्रेसचे राज्य होते असं सांगितलं जातं. पण त्यावेळी व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. भाजपचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद भाजपाच्या पाठिंब्याने गृहमंत्री होते. त्या ठिकाणी ज्यांना राज्यपाल नेमलं गेलं त्यांची धोरणे सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने योग्य नव्हती असा अजब तर्क शरद पवारांनी मांडला आहे. तर जेव्हा पंडितांवर हल्ले झाले तेव्हा राज्याची सूत्रे त्यांच्या हाती होती असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.