शरद पवारांनी आता ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा द्यावी!

राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांनी आता ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा द्यावी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांचा कुणबी जातीचा दाखला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर खुद्द शरद पवार यांनी सांगितले होते की माझी जात सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार यांनी आता ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा द्यावी अशी टीका शरद पवारांवर केली.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, शरद पवार म्हणाले होते की, मी कधीच जातीचे राजकारण केलं नाही. माझी जात लोकांना माहिती आहे असेही पवारांनी म्हटले. मात्र, याच गोष्टीवर आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली. शरद पवार यांनी एकदा गर्वाने सांगावे की ‘गर्व से हम मराठा’ आहे. एकदा घोषणा देऊन टाकावी. एक मराठा लाख मराठा ही घोषणाही द्यावी, म्हणजे तो प्रश्न संपून जाईल,असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

न्यूजक्लिक प्रकरणी अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमला समन्स

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!

रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे सारथ्य?

‘निज्जरच्या हत्येत सहभागाचे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या’!

 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबत शरद पवारांनी दिवाळी पाडव्याचा गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले की, “माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे.

Exit mobile version