शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या

शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या

“अँटालिया आणि मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सर्व पुरावे असतानाही देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं.” अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांची हकालपट्टी करण्यासाठी थेट शरद पवार यांनाच आवाहन केलं. “२००४ मध्ये वाझेंची हकालपट्टी करण्यात आली होती. २००७ मध्ये ते सेवेतून मुक्त झाले. या दोन्हीवेळा राष्ट्रवादीचाच गृहमंत्री होता. असं असतानाही वाझेंना आता सेवेत घेण्यात आलं आणि चांगली पोस्टिंग दिली. तसेच मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी.” अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. “पवारांनी एक तर देशमुख यांची हकालपट्टी करावी किंवा त्यांनीच या प्रकरणावर भाष्य करावं.” असंही सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

जयंत पाटील म्हणतात, वाझे प्रकरणावर चर्चाच नाही

आमदार अतुल भातखळकर, किरिट सोमय्या, राम कदम यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

अखेर सचिन वाझे याचे निलंबन

वरूण देसाईंना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून सचिन वाझेंची वकिली?

“हिरेन कुटुंबीयांच्या मनात अजूनही भीतीचं वातावरण आहे. मात्र, एनआयए तपास करत असल्याने त्यांचा या तपासावर विश्वास आहे.” असे सोमैय्या यांनी सांगितले. अँटालिया आणि हिरेन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे अधिकारी त्यात गुंतले होते. पुरावा कसा नष्ट करायचा हे त्यांना माहीत होतं. पण या अधिकाऱ्यांना कोण ऑपरेट करत होते? हे माहीत नाही.” असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version