शरद पवार म्हणाले….मोदी-अदानी मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती उपयोगाची नाही?

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी विरोधकांची हवाच काढली

शरद पवार म्हणाले….मोदी-अदानी मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती उपयोगाची नाही?

सध्या देशात काँग्रेस पक्षाने उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध जोडून गोंधळ सुरू केला आहे. संसदेतले तर कामकाजच या अधिवेशनात झालेले नाही. मोदी आणि अदानी यांचा काय संबंध आहे, याची मागणी करत संयुक्त संसदीय समितीची मागणी केली जात आहे. मात्र त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि पाच दशके राष्ट्रीय आणि राज्यातील राजकारणात वावरलेले शरद पवार यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे.

संयुक्त संसदीय समितीचे या सगळ्या प्रकरणात काही महत्त्वच नाही असे पवार म्हणतात. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आणि अशा अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मते व्यक्त केली.

हे ही वाचा:

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही करणार सलमान खानचे संरक्षण

शरद पवार यांनी सांगितले की, यापूर्वीही अनेक मुद्द्यांवर संसदीय समिती अर्थात जेपीसीची स्थापना झाली होती. एका प्रकरणात मीच जेपीसीचा अध्यक्ष होतो. जेपीसी यापूर्वी झालीच नाही, असे नाही. पण ती केली कशाला तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. पण ही मागणी केली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्वतः समिती स्थापन केलेली होती. निवृत्त न्यायाधीश, अर्थतज्ज्ञ, प्रशासक यांचा समावेश करून आमच्यासमोर अहवाल समितीने सादर करावा असे ठरले होते. पण दुसरीकडे विरोधकांची मागणी होती की, संसदीय समिती स्थापन करा. आता ती केली तर पार्लमेंटमध्ये बहुमत कुणाचे आहे तर भाजपाचे. मग या मागणीसाठी जी समिती स्थापन करणार त्यात पार्लमेंटमधील बहुमत असलेल्या पक्षाच्याच प्रतिनिधींची संख्या जास्त असेल. सर्वोच्च न्यायालयाने केलेली समितीच असती तर कदाचित त्यातून जास्त सत्य बाहेर कदाचित येऊ शकले असते. त्यामुळे पार्लमेंट समितीची गरज नव्हती.

मग काँग्रेसचा इरादा काय, यावर शरद पवार म्हणाले की, मला माहीत नाही इरादा काय आहे ते. सर्वोच्च न्यायालयाकरवी नेमली गेलेली समिती महत्वाची होती हे मला ठाऊक आहे. पण जेपीसीतून सत्य बाहेर आले असते की नाही माहीत नाही.

Exit mobile version