काँग्रेसच्या ठाम भुमिकेपुढे शरद पवार नरमले? म्हणतात युपीए अध्यक्ष होण्यात रस नाही

काँग्रेसच्या ठाम भुमिकेपुढे शरद पवार नरमले? म्हणतात युपीए अध्यक्ष होण्यात रस नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे अध्यक्ष होण्यात आपल्याला काहीही रस नसल्याचे म्हटले आहे. रविवार, ३ एप्रिल रोजी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण इतके दिवस पवार या संदर्भात का बोलले नाहीत असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शरद पवार युपीएचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव सादर करून पारित करण्यात आला. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून, हा ठराव मंजूर झाला. पण तेव्हा या प्रस्तावाला विरोध करणार्‍या शरद पवारांनी आता मात्र अध्यक्ष होण्यात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसे असले तरी देखील विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी आपण प्रयत्न करतच राहू असे पवार यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर

शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण

गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा

शरद पवार यांना जर युपीएच्या अध्यक्ष होण्यात स्वारस्य नव्हते तर आधीच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्याबद्दलची कल्पना का दिली नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. भाजपाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणे आवश्यक असून त्यांचे प्रभावीपणे नेतृत्व शरद पवराच करू शकतात असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना यूपीए अध्यक्ष बनवण्याचा ठराव पारित केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रस्तावाचे स्वागत करताना आम्ही आधीच याबद्दल भूमिका मांडली आहे असे स्पष्ट केले. पण या सर्वांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली पहायला मिळाली. युपीएचे नेतृत्व काँग्रेस पक्षच करेल आणि सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या त्या ठाम भूमिकेनंतर शरद पवार नरमल्याचे दिसत आहेत.

Exit mobile version