शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या विषयावर टाकला प्रकाश

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी २०१४, २०१९ मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाशी चर्चा झाली होती पण त्यांची विचारधारा वेगळी असल्याने ती चर्चा पुढे सरकली नाही, असे विधान केले आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी पुन्हा एकदा भाजपा राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला आहे.

 

 

पवारांनी या मुलाखतीत सांगितले की, २०१४, २०१७ आणि २०१९मध्ये भाजपाशी आम्ही चर्चा केली होती पण आम्ही नंतर निश्चित केले की आम्हाला असे करता येणार नाही कारण त्यांच्या विचारधारेशी आम्ही सहमत नाही. तेव्हा चर्चा करण्यात काही वावगे नाही. कारण ती एक लोकशाही प्रक्रिया आहे. पण आम्ही भाजपासोबत कधी गेलो नाही.

 

 

शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, मी अद्याप म्हातारा झालेलो नाही. ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या ओळीही त्यांनी बोलून दाखविल्या. मला निवृत्त व्हावे असे सांगणारे अजित पवार कोण? मी अजूनही काम करू शकतो.

 

हे ही वाचा:

नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर

‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!

सांताक्रूझच्या बड्या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरांचा लैगिंग छळ, सहकारी डॉक्टर विरोधात गुन्हा

जाणते, अजाणत्याच्या वाटेवर…

जर पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती ही चुकीची आहे तर मग प्रफुल्ल पटेल आणि इतरांच्या केल्या गेलेल्या नियुक्त्याही अवैध आहेत. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये प्रफुल्ल पटेल यांनीच माझे नाव अध्यक्षपदासाठी प्रस्तावित केले होते. अजित पवार यांना राष्ट्रवादीने चार वेळा उपमुख्यमंत्री केले तसेच निवडणूक हरल्यानंतरही प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रीत केले गेले. पीए संगमा यांच्या मुलीला मंत्री बनवले गेले पण सुप्रिया सुळे यांना मंत्री करण्यात आले नाही. मग ही घराणेशाही आहे काय? मग अजित पवार जे बोलत आहेत ते चुकीचे आहे.

 

Exit mobile version