उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद हे बाळासाहेबांचं वचन होतं की पवारांची सक्ती?

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद हे बाळासाहेबांचं वचन होतं की पवारांची सक्ती?

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे उडाला गोंधळ

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं, पण मी त्यांना सक्तीने मुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या सरकारच्या स्थापनेत माझा सहभागही आहे, पण किंचित आहे, असेही ते म्हणाले.

पण पवारांच्या या विधानामुळे खरोखरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की, पवारांनी सक्तीने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले याविषयी आता संभ्रम निर्माण झाला आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बाळासाहेबांना वचन दिलं होतं म्हणून मी मुख्यमंत्री झालो.

पवार म्हणाले की, सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष म्हणून शिवसेनाच होता. शिवाय, माझे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. त्यामुळे जेव्हा आम्ही तीन पक्ष एकत्र बसलो आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी चर्चा केली तेव्हा तीन-चार नावे समोर आली पण मी उद्धव ठाकरे यांचा हात वर केला आणि सक्तीने त्यांना मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांची इच्छा नव्हती पण मी त्यांना व्हायला भाग पाडलं.

 

हे ही वाचा:

रेल्वे प्रवासासाठी तिकीट नाहीच, पासच घ्यावा लागणार!

महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

 

मी उद्धव ठाकरेंना लहानपणापासून पाहिलेलं आहे. बाळासाहेब माझे मित्रं होते. त्यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते. पण व्यक्तिगत सलोखा अत्यंत जवळचा होता. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला भाग पाडावा ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे मी त्यांचा सक्तीने हात वर केला. त्यामुळे त्यांची निवड झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

Exit mobile version