अंधेरी पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळत असल्याचं बघायला मिळत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं, असे आवाहन करणारं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध व्हावी असे पत्र राज ठाकरे यांनी लिहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून आणावं असे मत मांडले आहे. अर्थात, जर तसे झाले तर त्याचे श्रेय आपल्याला मिळेल, असा पवार यांचा होरा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढत आहेत. भाजपकडूनहि या जागेसाठी उमेदवार देण्यात आला आहे. पण अंधेरी विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करा. त्यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असं पवार यांनी म्हटलं आहे . रमेश लटके यांचे विधिमंडळातील योगदान आणि उमेदवार निवडून येण्याचा कालावधी बघता ही निवडणूक बिनविरोध व्हावी. लटके यांच्या जागी राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. अंधेरी पोट निवडणूक प्रतिष्ठेची करू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
हे ही वाचा
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण
महाराष्ट्राची राजकीय परंपरा राखली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेतली होती अशी आठवण शरद पवार यांनी यावेळी करून दिली.राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना असेच पत्र पाठवले आहे याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय पत्र पाठवले ही त्यांची अंतर्गत बाब असल्याचे सांगून अधिक बोलण्याचं टाळलं. दीड वर्षाच्या कालावधीसाठी राजकारण नको. अर्ज मागे घेण्यासाठी अजून मुदत असल्याने मी हे आवाहन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पालिकेने योग्य निर्णय न घेतल्यानं लटके यांना कोर्टात जावे लागले असेही पवार म्हणाले.