23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणप्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

Google News Follow

Related

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सध्या राजकीय भेटी गाठींचं केंद्र ठरत असलेलं सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रशांत किशोर शरद पवारांना भेटणार आहेत. साधणतः या दोघांमध्ये दीड तास चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी १० वाजता ही भेट होणार आहे. पवार-किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर या भेटीमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती. आपल्या कारकीर्दीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मोठा विजय जमा केल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत निवडणूक व्यवस्थापनातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, “मी जे आता करत आहे ते यापुढे करण्याची इच्छा नाही. मी खूप काम केलं. आता ब्रेक घेऊन आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मला निवडणूक रणनीतीकार संन्यास घ्यायचा आहे,”

“पश्चिम बंगालमध्ये भाजपाला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचाच अर्थ भाजपला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. जर भाजपला यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी निवडणूक रणनितीकार म्हणून काम सोडेन,” असं निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भातील ट्वीट पिन देखील करुन ठेवलं होतं. त्यांनी भाजपबाबत केलेल्या दाव्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, अखेर निवडणूक निकालांनंतर प्रशांत किशोर यांचा दावा खरा ठरला.

हे ही वाचा :

अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी

४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

कॅनडातून आलेल्या पार्सलमध्ये सापडला कोट्यवधींचा गांजा 

आढावा बैठकीच्या नावाखाली काँग्रेसची कव्वाली मैफिल

निवडणूकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी  ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं.  ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार…’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. बिहार विधानसभा निवडणूकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. यानंतर पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभांच्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा