शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवल्यानंतर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांवर शरसंधान साधताना ते म्हणाले की, पवार साहेबांना निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करायला हवे असे विधान केले होते. शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा शरद पवारांचा डाव होता असा गंभीर आरोपही शिवतारे यांनी केला आहे.
शिवतारे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करायला हवे, असे विधान केले होते. शिवतारे यांनी पवारांवर खरपूस समाचार घेत हे मोठे लोक कुठे खेळतील हे सांगता येत नाही, असे सांगितले. शिवसेनेला संपवण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे, याचा सगळा दोष पवारांवर आहे. त्यांना याचा फायदा उठवायचा होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पवारांनी २०१४ मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. हा त्याचा कट होता. तो सफल झाला. शिवसेना-भाजप कायम राहावे असे पवारांना वाटत नव्हते. पवारांचा शिवसेनेशी कधीच संबंध नव्हता. पवार यांची बाळासाहेब ठाकरेंशी मैत्री असली तरी राजकीय मतभेद होते अशी टीकाही त्यांनी केली.
हे ही वाचा:
धक्कादायक!! गुगलवर कान्होजी आंग्रेंची पायरेट म्हणून ओळख
नाशिक अपघातप्रकरणी ट्रकचालकाला अटक
बालविवाहाचे प्रमाण झारखंडमध्ये अधिक
शरद पवार म्हणतात, बॉलिवूडला टॉप पोझिशनला पोहोचवण्यात मुस्लिमांचं मोठं योगदान
पवार हे बर्म्युडा ट्रँगल
लोकांना वापरायचं आणि सोडून द्यायचं हे पवार यांचं काम आहे. शरद पवार हे राज्यातील राजकारणाचा बर्म्युडा ट्रँगल आहे. त्यांच्या जवळ येणारे सर्व नाश पावतात. असेही विजय शिवतारे म्हणाले ‘शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी ५० वर्षांची जुनी संघटना त्यांच्या दावणीला बांधली. त्यांनी यातून स्वत:चा फायदा करुन घेतला अशी बोचरी टीका शिवतारे यांनी केली आहे.