महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाने आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये सात उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता पक्षाने पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाकडून मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पाच उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २२, तिसऱ्या यादीत नऊ, चौथ्या यादीत सात आणि आता पाचव्या यादीत पाच उमेदवरांची घोषणा केली आहे. यासह शरद पवार गटाकडून ८८ जागांसाठी आतापर्यंत उमेदवार देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांचे जागावाटप जवळ-जवळ संपत आले आहे. आता शेवटच्या टप्प्यातील जागा जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये माढा, पंढरपूर अशा महत्त्वाच्या जागांचा पेच असल्याचे बोलले जात होते. हा पेच आता सुटला असून येथून शरद पवार यांच्या पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींकडून ५१ हजार नोकऱ्यांची दिवाळी भेट
भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!
केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी
धनत्रयोदशी: आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी देवता धन्वंतरी
माढामधून अभिजीत पाटील, मुलुंड येथून संगिता वाजे, मोर्शीमधून गिरीश कराळे, पंढरपूर येथून अनिल सावंत आणि मोहोळ येथून राजू खरे यांना यादीत संधी देण्यात आली आहे. शरद पवार यांची ही शेवटची यादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.