25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणगरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

ते बिनविरोध विजयी पण संपूर्ण पॅनल पराभूत

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार नाही, असे स्पष्ट केलेले असले तरी अद्याप लहानसहान निवडणुकांमध्ये मात्र ते उभे राहात आहेत. गरवारे क्लबच्या निवडणुकीतही शरद पवार उभे राहिले आणि ते अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून आले. पण त्यांचे संपूर्ण पॅनल या निवडणुकीत पडले. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबचे शरद पवारांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे यावेळी ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिले, तेव्हा त्यांनाच यश लाभेल अशी शक्यता होती. मात्र त्यांच्या पॅनलमधील एकही व्यक्ती कोणत्याही पदावर निवडून आली नाही. त्यामुळे शरद पवारांचा करिष्मा संपला का, अशी चर्चा सुरू झाली. स्वतः ते निवडून आले पण आपल्या पॅनलला निवडून का आणू शकले नाहीत, असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

 

 

शरद पवारांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध जिंकली. पवार डेव्हलपमेंट ग्रुप आणि जीसीएच डायनॅमिक ग्रुप यांच्यात ही लढत होती. या निवडणुकीत १३ हजार लोकांनी मतदान केले. हे मतदान ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष पद्धतीने पार पडले. त्यात पवारांनी एकट्याने आपल्या पॅनलतर्फे बाजी मारली.

 

हे ही वाचा:

… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन

विद्यार्थ्यांच्या राजकारणाचे पर्यवसान आंतरराष्ट्रीय गँगस ऑफ पंजाबमध्ये

भारतीय खेळाडू ‘घोड्या’वर स्वार

केशवजी नाईक चाळ गणेशोत्सवाला नड्डा यांची भेट!

गेली ३० वर्षे शरद पवारांचे आणि त्यांच्याच माणसांचे एकहाती वर्चस्व या क्लबवर होते पण आता त्यांच्याव्यतिरिक्त बाकी कुणीही या क्लबच्या कार्यकारिणीत नाही. या क्लबच्या ठेवी १२ कोटींवरून २०० कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. दरम्यान या निवडणुकी शरद पवार यांच्या पॅनलमधून लढणारे भाजपाचे माजी आमदार राज पुरोहित हेदेखील पराभूत झाले. डायनॅमिक ग्रुपच्या पाठीशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा होते. त्यांनी डायनॅमिक ग्रुपला हे यश मिळवून दिले.

 

 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शकले पडल्यानंतरही शरद पवार हेच कसे प्रबळ राजकारणी आहेत, असे सांगितले जात आहे. पण या निवडणुकीतील त्यांच्या पॅनलच्या पराभवामुळे पवारांची क्लब्सच्या राजकारणातली पकडही ढिली पडत चालली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधी, शरद पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट बोर्ड, आयसीसीतही अध्यक्षपदाच्या निवडणुकी लढवून विजय मिळविलेले आहेत. त्यावेळीही त्यांच्या पॅनलमधील सदस्य पराभूत झाले तरी शरद पवारानी मात्र स्वतःचा पराभव होऊ दिलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा