राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांची आज भेट होणार आहे. ही भेट दुपारी दोन वाजता होईल. संसदेतील अमित शाह यांच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट होणार आहे. सहकाराच्या मुद्द्यावर भेट होत असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर १७ दिवसांनी शरद पवार अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे आणि सुनील तटकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. आज सकाळी १४ विरोधी पक्षांसह काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी भेट घेतली होती.
सुप्रीया सुळे या बैठकीत राहुल गांधी यांच्यासोबत दिसून आल्या होत्या. परंतु, या बैठकीच्या दोन तासांनीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात १७ जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
हे ही वाचा:
सरकार आता चिठ्ठी काढून निर्बंध-अनिर्बंधचा खेळ खेळतेय
हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?
सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?
सर्वांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावा
शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. शरद पवार हे १७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.