राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या भेटीदरम्यान सांगितले. संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात ही भेट झाल्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीसंदर्भात माहिती दिली. बुधवारी २० ते २५ मिनिटे शरद पवार आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर शरद पवार यांनी ही भेट घेतल्यामुळे या कारवाई संदर्भात ते मोदी यांच्याशी काय बोलतील प्रश्न उपस्थित झाले होते. संजय राऊत यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याची काय गरज होती, असे पवार यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले. यावेळी लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार पी पी मोहम्मद फैझल त्यांच्यासोबत उपस्थित होते.
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा यावेळी पवारांनी मांडला. त्यांच्यावर कारवाईची गरज काय होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अडीच वर्षे झाले तरी विधानपरिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती झालेली नाही, हा मुद्दाही नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचे शरद पवार यांनी मांडला.
हे ही वाचा:
धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं
RRR १००० कोटींच्या उंबरठ्यावर! PK ला मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम
अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात
‘काही लोकांचा नखं कापून शहीद होण्याचा प्रयत्न’
महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे आपापसात ते एकमेकांना नाराज करणार नाहीत तेवढी समज सरकारमध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व सुरळीत चालू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ संपवून पुन्हा सत्तेत येणार असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे भाजपा विरुद्ध आहेत, असेही ते म्हणाले. राज्यात सध्या सुरू असलेला भोंग्यांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे मी लक्ष देत नाही. राज ठाकरे हे पूर्वी भाजपाविरोधी होते आणि आता ते बदलले आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडलेल्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी हे नक्कीच विचार करतील आणि निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले.
मोहम्मद फैझल यांनी लक्षद्वीप संबंधित काही प्रश्नांवर चर्चा केली. लक्षद्वीपमधील नागरिकांच्या मुलभूत सुविधांसाठी, ७५ हजार लोकांवर असलेल्या बेरोजगारीच्या संकटाविषयी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे मोहम्मद फैझल म्हणाले.