विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात गौप्यस्फोट केल्यानंतर शरद पवारांनी भाजपा विरोधात जुनाच ‘राग’ आळवला आहे. १२५ तासांचे व्हिडीओ फुटेज मिळवणे हे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय शक्य नाही असे पवार यांनी म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नाही देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे.
मंगळवार, ८ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ठाकरे सरकारवर बॉम्ब फोडला आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील आणि सत्तारूढ पक्षाशी संबंधित नेते कसा कट रचतात याचा पूर्ण कच्चाचिठ्ठा फडणवीसांनी विधिमंडळात मांडला. त्याचे पुरावे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केले. फडणवीसांच्या या आरोपांनी राज्यात एकाच खळबळ उडाली.
हे ही वाचा:
सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा
महिला दिनाच्या दिवशीच महिला बचत गटाचे हॉटेल पेटवले!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना हा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. तर हे आरोप गंभीर असून सरकारने या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे असे म्हटले आहे. १२५ तासांचे रेकॉर्डिंग होते ही बाब कौतुकास्पद आहे पण केंद्रीय तपस यंत्रणांच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य नाही असे पवारांनी म्हटले आहे. तर केंद्रीय तपस यंत्रणांचा गैरवापर करून चौकशी केली जाते याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे असे पवार म्हणाले. देशमुखांवर एकूण ९० वेळा छापे पडले.
तर या संपूर्ण प्रकरणात माझे अप्रत्यक्ष नाव आले असले तरीही माझा ह्याच्याशी काहीही संबंध नाही असा खुलासा पवार यांनी केला आहे. त्याचवेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे.