शरद पवारांकडे पहिल्यापासूनच ओबीसी दाखला?

शरद पवारांच्या नावाचा ओबीसी दाखला सोशल मीडियावर व्हायरल

शरद पवारांकडे पहिल्यापासूनच ओबीसी दाखला?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला व्हायरल झाला आहे.ज्यामध्ये पवारांच्या जातीचा प्रवर्ग ओबीसी असल्याचं दिसत आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्याने राज्यात पेट घेतला असून दुसरीकडे विरोधकांच्या सरकार विरोधात राजकीय फैऱ्या काही कमी होताना दिसत नाहीत.मराठा आंदोलक जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला देण्याची मागणी करत आहेत.तर दुसरीकडे विरोधकही त्यांच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत.मात्र, आता शरद पवार यांच्या नावाचा एक दाखल व्हायरल आहे.व्हायरल झालेल्या दाखल्यात शरद पवार हे ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे दाखवण्यात आलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलक मनोज जरांगे धडपडत आहेत.जरांगे यांच्या आंदोलनानंतर विरोधकही पुढे सरसावत त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं सांगत आहेत.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.मात्र, शरद पवारांनी आधीच कुणबी दाखला काढला असून या आधीपासून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्हायरल झालेल्या दाखल्यात शरद पवार ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा.. 

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!

परंतु हा दाखला फेक असल्याचं महिला खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.हे जाणूनबुजून कुणीतरी केलं आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.तसेच संभाजी ब्रिगेड ने देखील तसाच दावा केला आहे.संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी सांगितलं की, शरद पवारांचा ओबीसी उल्लेख असलेला दाखला जाणूनबुजून संघ आणि भाजप व्हायरल करत आहे.पवारांचा मराठा असा उल्लेख असलेला दाखला संभाजी ब्रिगेडने पुढे आणला आहे. पवारांच्या शाळेतील दाखल्यावर मराठा असा उल्लेख असताना काही जण जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला व्हायरल केला जातोय. जे जिजाऊचे वंशज असल्याचं सांगतात त्यांनी हे केलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

 

 

Exit mobile version