भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार कधीही शिवसेना सोबत निवडणूक लढवणार नाहीत असे राणे यांनी म्हटले आहे. तर ही शरद पवार यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे असे राणे यांचे म्हणणे आहे. ट्विटरच्या माध्यमातून नारायण राणे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे.
गुरुवार, १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मधील राष्ट्रवादी भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा मित्र असलेल्या शिवसेनेचेही भरभरून कौतुक केले. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे अशा प्रकारचे विधान पवार यांनी बोलताना केले. तर भविष्यात शिवसेनेसोबत एकत्रित निवडणूक लढवण्या संबंधातही त्यांनी सूतोवाच केले.
हे ही वाचा:
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
तीन पक्ष एकत्र येऊन पडलो कसे? या प्रश्नावर चर्चा झाली असावी
भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप
स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला
पवारांच्या याच विधानावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पवारांवर तोफ डागली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत.” असे ट्विट राणे यांनी केले आहे तर त्यापुढे जाऊन पवारांनी ही काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो असे राणे यांनी म्हटले आहे.
ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 11, 2021