31 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरराजकारण“मराठा समाजाचे आरक्षण घालवायलाही आणि आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार”

“मराठा समाजाचे आरक्षण घालवायलाही आणि आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार”

इतिहासकार नामदेवराव जाधव यांचा शरद पवारांवर घाणाघात

Google News Follow

Related

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवार असल्याचा दावा इतिहासकार नामदेवराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. शरद पवार गटाला मिळालेल्या चिन्हाचे अनावरण नुकतेच रायगडावर पार पडले. या कार्यक्रमावर टीका करताना जाधव यांनी शरद पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या बोलवत्या धान्याबद्दल परखड वक्तव्य केले आहे.

“मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार असून येत्या २३ मार्चला शरद पवार यांच्या बारामतीतील घरांवर मोर्चा काढणार आहोत,” अशी माहिती प्राध्यापक आणि लेखक नामदेव जाधव यांनी दिली आहे. “सुरुवातीपासून जरांगे हे शरद पवार यांच्यावर बोलणं टाळत होते. तसा संशय होता. त्यामुळे लोकांचंही लक्ष होते. यांच्यामागे कोणीतरी बोलवता धनी आहे, असं लोक म्हणत आहेत. मुख्यमंत्रीही नेमकं तेचं बोलले आहेत,” अशी टीका नामदेव जाधव यांनी केली आहे.

“महाराष्ट्र अस्थिर करण्यामध्ये कायम एकच व्यक्तीचा हात असतो. ते म्हणजे शरद पवार. जेव्हा- जेव्हा शरद पवार सत्तेच्या बाहेर जातात, तेव्हा ते मराठ्यांना उचकवतात. सत्तेत आलं की हातावर तुरी देतात. आरक्षणावर बोलण्याचं टाळतात. हे त्यांनी गेली ४० वर्षे केलं आहे,” अशी घाणाघाती टीका नामदेव जाधव यांनी शरद पवारांवर केली. शरद पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. कधीही मराठा आरक्षणावर ‘ब्र’ काढला नाही. कायद्याने मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं शरद पवार यांचं वक्तव्य असल्याची २०१० ची बातमी आहे. आरक्षण घालवायलाही शरद पवार जबाबदार आहेत. आरक्षण न मिळायलाही शरद पवारच जबाबदार आहेत,” असा घणाघातही जाधव यांनी केला आहे.

“शरद पवार ‘तुतारी वाजवणाऱ्या माणसा’च्या चिन्हाचं लोकार्पण करण्यासाठी पालखीत बसून रायगडावर गेले. हे त्यांचं कार्य हे निषेधार्थ आहे. आपल्या राजकारणासाठी शरद पवार यांनी केलेला हा कार्यक्रम आहे. याचा निषेध करत आहोत. येत्या शनिवारी रायगडावर लाखो शिवभक्त कुठल्याही पक्षाचे असो त्यांनी यावे. आपापल्या भागातल्या पवित्र नदीचं आणि गोमूत्र घेऊन आपण रायगड पवित्र करूया. यासाठी सर्वांनी सहभागी व्हा,” असे आवाहनही नामदेव जाधव यांनी यावेळी केलं आहे.

हे ही वाचा:

तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…

आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले

ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावर शरद पवार यांनी पालखीतून येत महाराजांचा अपमान केला आहे. रायगडवर केवळ छत्रपती शिवाजी महाराजच पालखीतून आगमन करत असत. मात्र, शरद पवार यांनी पालखीतून येत छत्रपतींचा अपमान केला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड आदी व्यक्ती मेघडंबरीवर चढले होते. हा सर्व प्रकार निंदनीय आहे,” अशी टीका नामदेव जाधव यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा