मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर

मलिकांवर आरोप गंभीर, तरी पाठीशी पवार खंबीर

एकीकडे राज्यभरातून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवाडी काँग्रेस पक्ष मालिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हटले आहे. तर मलिक यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयामार्फत त्यांना अटक करण्यात आली होती. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप मलिकांवर आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात राहायचा नैतिक अधिकार नाही असा दावा विरोधी पक्ष भाजपा करत आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांनी आळवला जुनाच राग

सरकारी वकिलांचे कार्यालय की राजकीय कत्तलखाना!

विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!

नवाब हटाओ! भाजपाचा आज मुंबईत विराट मोर्चा

मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. गेले काही दिवस भाजपमार्फत सातत्याने नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरअनोंदलं करत आहे. तर आज याच मागणीसाठी मुंबईत भाजपचा विराट मोर्चा निघत आहे. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. ‘नवाब हटाओ’ या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाला आहे.

पण असे असले तरी देखील नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. सुरुवातीपासूनच पवार हे मलिकांना पाठीशी घालताना दिसत होते. नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात असल्याचे पवार म्हणाले होते. त्याचा पवारांनी पुनरुच्चार केला आहे. मुस्लिम कार्यकर्त्याचे नाव दाऊदशी जोडणे दुर्दैवी असल्याचे पवार म्हणाले.

Exit mobile version