शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

गुजरातमध्ये झाली दोघांची भेट

शरद पवारांनी केले अदानींच्या प्रकल्पाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी गुजरातला जाऊन उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली. शरद पवार थेट अदानींच्या अहमदाबाद येथील घरी पोहोचले आहेत. एका खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार हे अदानींच्या घरी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. लॅक्टोफेरीन प्लान्ट एक्झिमपॉवर या प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. वासना, गुजरात येथे अदानींचा हा प्रकल्प उभा राहिला आहे.

 

 

अहमदाबाद भेटीत शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील आहेत. त्यामुळे ही एक कौटुंबिक भेट असू शकते, असेही सांगण्यात येत आहे. यावर्षी २० एप्रिल रोजी शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती. त्यानंतर २ जून रोजी त्यांची दुसरी झाली होती. यावेळी दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. याही भेटीचा तपशील समोर आला नाही.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

गाझी बाबा, पानसिंह तोमर यांना यमसदनी पाठवणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे निधन

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस; शाळांना सुट्टी

 

आता शरद पवार हे तिसऱ्यांदा गौतम अदानींना भेटले आहेत. त्यामुळे विरोधकांची गौतम अदानींबाबत असणारी भूमिका आणि शरद पवार यांची अदानींबाबतची भूमिका यात अंतर असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गौतम अदानींवर हिंडेनबर्ग अहवालातून गंभीर आरोप झाल्यानंतर एका मुलाखतीत शरद पवारांनी अदानींची पाठराखण केली होती. पूर्वी टाटा, बिर्ला यांच्यावर आरोप व्हायचे, तसे आता अदानींवर होत असल्याचेही शरद पवार म्हणाले होते.

 

 

दरम्यान, अदानी यांच्यासंदर्भात पवारांची भूमिका आयएनडीए आघाडीतील इतर पक्षांहून निराळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Exit mobile version