देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर

पत्रकार परिषदेतून दिली उत्तरं

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर

राज्यातून गेल्या दीड वर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता असून गृहमंत्र्यांनी इतर काही वक्तव्ये करण्यापेक्षा बेपत्ता मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलावं, असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा- राष्ट्रवादीच्या सरकारबद्दल केलेल्या गौप्यस्फोटाच्या मुद्द्याला बगल दिली. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

राज्यात शिवसेना- भाजपाचे नवे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात राज्यात कायदा अन् सुव्यवस्थाची परिस्थिती चिंतेचा विषय आहे. २३ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ पर्यंत पुणे शहरातून ९३७ मुली बेपत्ता आहेत. ठाण्यातून ७२१, मुंबईतून ७३८ मुली बेपत्ता आहे. तसेच सोलापूरातून ६२ मुली बेपत्ता आहेत. सर्व मिळून २ हजार ६५८ मुली बेपत्ता आहेत. १४ जिल्ह्यातील हा आकडा ४ हजारापेक्षा जास्त आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दीडवर्षात ६ हजार ८८९ मुली बेपत्ता झाले आहे. राज्यातील गृहमंत्र्यांनी बाकीचे वक्तव्य करण्याऐवजी या महिलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करायला हवे, अशी आकडेवारी मांडत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुलाखतीत देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले होते की, शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर तीन चार दिवसांनी शपथग्रहण करण्यापूर्वी शरद पवारांनी अंग काढून घेतले पण तरीही आम्ही शपथ घेतली. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी अंग काढून घेतले तर शपथ का घेतली. पण, फडणवीस यांच्यासोबत बैठक झालीच नव्हती, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले नाही.

समान नागरी कायद्यावर भाष्य

शरद पवार यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केलं. या कायद्यासंदर्भात शीख, ख्रिश्चन, जैन समाजातील लोकांचे काय मत आहेस हे जाणून घेतले पाहिजे. शीख समाजातील लोकांचे या कायद्याबाबत वेगळे मत असल्याचे ऐकिवात असल्याचे शरद पवार म्हणाले. विधी आयोगाच्या सूचना आलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधानांनी याबाबत स्पष्टता द्यावी. त्यानंतर माझा पक्ष यासंदर्भात भूमिका घेईल, असंही शरद पवार म्हणाले.

आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारकडून पावलं उचलली जात असल्याचं शरद पवार म्हणाले. देशातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मोदींची सत्ता नाही. त्यामुळे वेगळे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचंही ते म्हणाले.

राज्यातील दंगलींवर प्रश्न

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दंगली घडवल्या जात आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. कोल्हापूर, संगमनेर आणि इतर ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी केल्या जात आहेत का हे तपासलं पाहिजे, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

पिकनिकला गेलेल्यांची कार पडली ३० फूट खड्ड्यात; तिघे दगावले!

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मनसेचा विरोध !

सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेला उत्तर

नरेंद्र मोदी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून शरद पवार यांनी उत्तर देत म्हटले की, “माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला आहे. स्वतःचं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींचं वक्तव्य हे अशोभणीय आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

Exit mobile version