महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलीच झोंबलेली दिसत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अवघ्या काही तासातच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढे तीन-चार महिने राज ठाकरे काय करतात ते मला माहित नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत.
शनिवार, २ एप्रिल रोजी पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच झोडपून काढले. महाराष्ट्रात जातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासून सुरू झाले असा आरोप त्यांनी यावेळी केला. तर राज्यातील सत्ताधारी विकास आघाडी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या एकूणच भाषणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माध्यमांमध्ये बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
‘संडे स्ट्रीट’ साठी आणखी तीन नवे मार्ग
‘मविआ पेटीएमने मतदारांना पैसे देतेय’
राज ठाकरे बरिच वर्ष भूमिकेत झाले होते. त्यांचा काहीच अंदाज कोणाला येत नव्हता. पण राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणामुळे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात यायला उत्सुक असल्याचे दिसून आले. राज ठाकरे दोन चार महिने भूमिगत असतात. मग एखादं व्याख्यान देतात आणि पुन्हा तीन-चार महिने पुढे काय करतात ते मला माहित नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला.
यावेळी त्यांनी २०१९ च्या राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आठवण करून दिली. राज ठाकरे यापूर्वी मोदींच्या संदर्भात काय भूमिका मांडत होते हे महाराष्ट्राने पाहिलं. पण आता त्यात बदल झालेला दिसतो. आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. पण उद्या काय होईल ते सांगता येत नाही. त्यांच्या भूमिकेत कधीच सातत्य नसतं हे वारंवार दिसून आले आहे असे शरद पवार म्हणाले. निवडणुकीत त्यांचा पक्ष किती प्रभावी ठरेल हे मला माहित नाही. मागच्या निवडणुकांमधले आकडे हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडे अत्यंत मर्यादित ताकद आहे. त्यांचा हाताच्या बोटांच्या पलीकडे जात नाही. त्यानंतर ते काय कतृत्व दाखवतील ते सांगता येणे शक्य नाही असे शरद पवार म्हणाले.