शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांनी कोरोनाची दुसरी लस घेतली. साधारण महिनाभरानंतर शरद पवारांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली आहे. शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी घरीच कोरोना लस घेण्याचा निर्णय घेतला आहे.

“आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!” असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.

तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

लेहमध्ये बदलापूरच्या जवानाला हौतात्म्य

ठाकरे सरकारने व्यापाऱ्यांना रस्त्यावर आणले

लॉकडाऊनवरून ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले

तात्काळ पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १ मार्च सोमवारी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली होती. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोविशील्ड लस देण्यात आली.

Exit mobile version