बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र शोकाकुल झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपतींच्या इतिहासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. पण त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते असे पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा अनेक मान्यवरांनी आपले दुःख व्यक्त केले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मात्र प्रतिक्रिया देताना वादग्रस्त विषयाला हात घातला आहे. नाशिक येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे ही वाचा:

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

कार्तिकी एकादशीला माऊलीची आणि लेकरांची भेट होणार…

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर ठेवला. पण त्यात काही वादग्रस्त मुद्देसुद्धा होते असे पवार यांनी म्हटले आहे. त्यापुढे त्यांनी असे स्पष्टीकरण दिले की या बाबत भाष्य करायला मी कोणी जाणकार नाही किंवा मी कोणी तज्ज्ञ देखील नाही. पण त्यांची कामगिरी मोठी आहे. त्यांनी शिवचरित्रासाठी आपले आयुष्य खर्ची घातले असे पवार म्हणाले.

तर बाबासाहेब पुरंदरे यांनी नव्या पिढीला इतिहास सांगितला. जनजागृती केली. नव्या पिढीची इतिहासाशी ओळख करून दिली. नव्या पिढीत इतिहासाबाबत आस्था निर्माण केली. पण हे सांगताना त्यांचे कार्य पुढे कसे सुरु राहावे याबाबत मी भाष्य करणार नाही. त्यात वेगवेगळी मते आहेत. त्यात मला पडायचे नाही असे पवार म्हणाले.

Exit mobile version