फाळणीच्या स्मृती जागविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पवारांना झोंबला

दोन समाजात तेढ निर्माण होईल असा दावा

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात आणि देशात चर्चा रंगलेली असताना शरद पवारांनी त्याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली पण त्यात त्यांनी फाळणीच्या स्मृती जागविण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. विभाजन विभिषिका स्मृती दिन १४ ऑगस्टला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. १० ऑगस्टला सरकारने त्याचे एक सर्क्युलर काढले. ते सर्क्युलर दाखवत पवारांनी हा निर्णय हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी घेतल्याचे विधान केले.

 

पवार म्हणाले की, हा निर्णय घेऊन दोन समाजात कटुता निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनी ही चिंता व्यक्त करत एकप्रकारे मुस्लिम अनुनयाची परंपरा कायम ठेवल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी यानिमित्ताने केली.
१४ ऑगस्ट १९४७ला देशाची फाळणी झाली. त्यात अखंड भारताची शकले झाली. मुस्लिमांचा स्वतंत्र देश हवा या दुराग्रहातून पाकिस्तान हा देश निर्माण झाला. त्यातून लाखोंच्या हत्या झाल्या, अत्याचार झाले, घरेदारे उद्ध्वस्त झाली. पण हा इतिहास आठवण्याची गरज नाही, असे पवारांचे मत आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला घेतले ताब्यात !

वांद्रे येथील व्हायरल व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमधील चर्च आणि इमारतींची तोडफोड !

बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !

पवारांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भारत पाकिस्तान हे दोन देश झाल्यानंतर हिंदू मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण झाली. पण आता इतक्या वर्षांनी ती कमी होत आहे. तेव्हा या स्मृती जागवून या समाजात दुरावा निर्माण करण्याची काय गरज आहे? तत्कालिन स्वातंत्र्यसैनिकांना बोलावून त्यांच्याकडून या फाळणीच्या आठवणी जागविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे, असेही पवार म्हणाले. पण या सगळ्याची काय आवश्यकता आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

या फाळणीच्या दिवसांच्या आठवणी चित्रप्रदर्शनाच्या रूपात दाखविल्या जाणार आहे, त्यापासून आपण सावध राहायला हवे, असे पवार म्हणाले. त्यातून दोन समाजातील कटुता वाढीस लागेल. फाळणीच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याच्या वेदना दोन्ही समाजाच्या लोकांना भोगाव्या लागलेल्या असताना त्यातून तेढ निर्माण कशी होईल, हे पवारांनी का सांगितले नाही, असा प्रश्न यानिमित्ताने विरोधकांनी उपस्थित केला.

 

आयएनडीआयए (I.N.D.I.A.) च्या आगामी बैठकीत आपण या विषयावर बोलणार आहोत. सगळ्यांना या विषयाकडे गांभीर्याने घेण्याची विनंती करणार आहोत, असे पवार म्हणाले. आपापल्या राज्यात या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहनही करणार असल्याचे पवार म्हणाले.

Exit mobile version