सक्तवसुली संचालनालयाचा यापूर्वी कधीही असा उपयोग झाला नव्हता, जसा आता होतो आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ईडीच्या कारवाईबद्दल पुन्हा एकदा खदखद व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच सध्या महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे किंवा चौकशीसाठी सातत्याने समन्स पाठविले आहे. ते शरद पवारांना रुचलेले नाही. ते म्हणतात की, विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे.
सध्या ईडीने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर कारवाई केलेली आहे. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आदिंवर ईडीने कारवाई केली आहे. त्यातील अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांची संपत्तीही ईडीने जप्त केली आहे. ही कारवाई सुडाची आहे, अशी ओरड सातत्याने विरोधकांकडून केली जात असली तरी या कारवाईत कुठेही कायद्याच्या चौकटीच्या पलिकडे जाऊन कारवाई केल्याचे दिसलेले नाही.
पवारांना इतर राज्यांचीही चिंता लागून राहिल्याचे दिसते. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब व दक्षिणेकडील काही राज्यांनाही ईडीचा त्रास होत असल्याचे दुःख पवारांनी व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
ऐका का झाली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची स्थापना…
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी दुसरी चौकशी समिती तयार करा
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे गोल्डमिंटन
पवारांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कर नाही त्याला डर कशाला असे नेटकरी म्हणत आहेत तर अशी कोणती कामे केली आहेत की, ईडीची कारवाई केली जात आहे? असाही सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, यूपीएचे सरकार असताना होत असलेल्या कारवाईला काय म्हणाल? एक नेटकरी म्हणाला आहे की, जर खासदार, लोकप्रतिनिधी स्वच्छ असतील तर त्यांनीच पुढे येऊन चौकशीला सामोरे गेले पाहिजे. ते चौकशीपासून दूर का पळत आहेत?